24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरलातुरात बावनकुळेंना दाखवले काळे झेंडे

लातुरात बावनकुळेंना दाखवले काळे झेंडे

लातूर : प्रतिनिधी
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षाच्या विविध कार्यक्रमासाठी मंगळवारी लातूर जिल्ह्याच्या दौ-यावर आले असता मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातच त्यांना काळे झेंडे दाखवून तीव्र निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा दिल्या.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे लातूर जिल्ह्यातील लातूर, अहमदपूर येथील कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आले होते. मंगळवारी सकाळी त्यांचे विमानाने लातूर येथे आगमन झाले. विमानतळावरुन ते लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी आले. चौकात येताच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे पुढे येऊन काळे झेंडे दाखवून बावनकुळे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशाही घोषणा कार्यकर्ते देत होते. कार्यकर्ते बरेच आक्रमक दिसून येत होते.

बावनकुळे चौकात आल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी पुतळयापर्यंत जाईपर्यंत कार्यकर्त्यांनी त्यांच्या समोरच घोषणा दिल्या, काळे झेंडे दाखविले. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना काळे झेंडे दाखवणार हे बहुधा सुगावा पोलीस यंत्रनेला लागलेला असावा. या दौ-यादरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मराठा कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी काळे झेंडे दाखवताच पोलीस पुढे सरसावले. त्यांनी यावेळी २० ते २१ जणांना ताब्यात घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR