26.4 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रमहिला पोलिस कर्मचा-यावर ब्लेडने हल्ला

महिला पोलिस कर्मचा-यावर ब्लेडने हल्ला

विठ्ठलवाडी ठाण्यातील घटना

उल्हासनगर : घरगुती वादाची तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या एका दारुड्याने चक्क विठ्ठलवाडी ठाण्यात महिला पोलिसावर ब्लेडहल्ला केल्याची खळबळजनक घटना उल्हासनगरात घडली आहे. सकाळच्या सुमारास नशेत असलेला बाबासाहेब सोनवणे हा घरगुती वादाची तक्रार देण्यासाठी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात आला. तो धिंगाणा घालत होता. महिला पोलिस कर्मचारी शीतल भांबळे त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतानाच, अचानक सोनवणे याने खिशातून ब्लेड काढले आणि महिला पोलिस कर्मचारी शीतल भांबळे यांच्या दिशेने सपासप वार करायला सुरवात केली.

या अनपेक्षित हल्ल्यात महिला पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डोक्यावर, मानेवर आणि गालावर गंभीर जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर तातडीने उपस्थित पोलिसांनी दारुड्या आरोपी बाबासाहेब सोनावणे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी महिला पोलिस शीतल भांबळे यांना तातडीने शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेनंतर पोलिस ठाण्यातील महिला कर्मचा-यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR