30.6 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयफटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, तीन ठार

फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, तीन ठार

दमोह : मध्य प्रदेशमधील दमोह येथील अवैध फटाक्­यांच्­या कारखान्­यात मंगळवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत तीन जण ठार झाले असून १० हून अधिक जण जखमी झाले आहेत. अनेक लोक गाडले गेल्याची भीती व्­यक्­त होत आहे.

दमोह येथील दाट लोकवस्तीच्या परिसरात बेकायदा फटका कारखाना सुरू होता. येथे दिवाळीसाठी फटाके मोठ्या प्रमाणात बनवले जात असल्याचे स्­थानिकांनी सांगितले. स्फोटात जखमी झालेल्यांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेबात जिल्हाधिकारी मयंक अग्रवाल म्हणाले की, शहराच्या मध्यभागी असलेल्या एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याची माहिती मिळाली. या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. उपचार सुरू आहेत. चौकशीचे आदेश दिले आहेत, दोषींवर कारवाई केली जाईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR