21 C
Latur
Thursday, January 2, 2025
Homeमहाराष्ट्रलोकप्रतिनिधींना गावबंदी करणे हा गुन्हा : छगन भुजबळ

लोकप्रतिनिधींना गावबंदी करणे हा गुन्हा : छगन भुजबळ

नागपूर : मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारला इशारा दिला आहे. तसेच ते राज्यभर दौरा करत आहेत. दरम्यान, मंत्री छगन भुजांभळ यांनी मनोज जरांगेवर टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधींना गावबंदी करणे हा गुन्हा आहे. या प्रकरणाच्या गुन्ह्यात एका महिन्यांची शिक्षा होते. आरक्षण या तारखेपर्यंत द्या आणि त्या तारखेपर्यंत द्या म्हणजे ब्लॅकमेलिंग नाही तर आणखी काय आहे? सरकारने तीन तीन न्यायाधीश बसवले आहे वाट पाहा, असा सल्ला देखील त्यांनी जरांगेंनी दिला आहे.

भुजबळ म्हणाले की, गावबंदीमुळे आमदार-खासदार यांना गावात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. त्यांना काम करू दिले जात नाही. हा गुन्हा आहे याला एक महिन्याची शिक्षा देखील आहे. एकदा ओबीसीमध्ये आल्यानंतर शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण लागू होणार आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार नाही पण धक्का बसणारच आहे. सरसकट प्रमाणपत्र दिले म्हणजे ओबीसीमध्ये आले. बहुतांश लोक मलाच दोषी धरत आहे. मी पूर्ण मराठा समाजाला दोष देत नाही, पण काहींची झुंडशाही सुरू आहे, दादागिरी करत आहे त्यांच्या विरोधात आहे. मी अनेक मोठे मोठे लोक अंगावर घेतले आहेत. ‘तू किस झाड की पत्ती’, असे म्हणत जरांगे यांच्या टिकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

तसेच २४ डिसेंबरला हल्ला करण्याची आणि घर जाळण्याची तयारी सुरु असल्याचा आरोप मंत्री भुजबळांनी गुरुवारी विधानसभेत जरांगेंवर केला. त्यांनी यावेळी समाज माध्यमावरील मेसेजही वाचून दाखवला. प्रकाश सोळंकी, संदीप क्षीरसागर यांची घरे जाळली त्याप्रमाणेच माझेही घर जाळले जाईल अशी भीती भुजबळांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्न करत आहे. बीडमध्ये अनेकांची घरे आणि कार्यालये कट करून पेटवण्यात आली. यात जीवितहानी होण्याची शक्यता आहे, असे भुजबळ म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR