28.5 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeसोलापूरदफन केलेल्या १० महिन्यांच्या बाळाचा मृतदेह गायब

दफन केलेल्या १० महिन्यांच्या बाळाचा मृतदेह गायब

सोलापूर – शहरातील मोदी स्मशानभूमी येथे दफन केलेल्या १० महिन्याच्या बाळाचा मृतदेह खड्ड्यातून गायब झाल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रियांश वाघमारे (वय १० महिने) या बाळाचा १४ जून रोजी शहरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याने त्याच्यावर मोदी स्मशानभूमीमध्ये एका खड्ड्यात दफनविधी करण्यात आले होते.

रविवारी मयताचा तिसरा दिवस असल्याने वाघमारे कुटुंबिय हे सकाळी मोदी स्मशानभूमी येथे विधीसाठी गेले असता त्यांना खड्ड्रा उकरलेला दिसला व त्यावरील फरशी बाजूला काढलेली दिसली. वाघमारे कुटुंबियांना संशय आल्याने त्यांनी खड्डयातील माती बाजूला काढली असता खड्डयात प्रियांशचा मृतदेह मिळाला नाही.

त्यामुळे वाघमारे कुटुंबियांनी याबाबत सदर बझार पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व श्वान पथकाच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे मृणाली राहुल वाघमारे (रा. २ नं. झोपडपट्टी, चॉदतारा मशिदीजवळ, सोलापूर) यांनी सदर बझार पोलिसांकडे तक्रारी अर्ज दिला असून त्यावरुन सहायक पोलिस निरीक्षक सागर काटे यांनी तपास सुरु केला आहे. मोदी स्मशानभूमीमध्ये पालिकेकडून सुरक्षेची कोणतीच सोय केलेली नाही. याठिकाणी तळीरामांचा अड्डा असल्याची तक्रार वाघमारे यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR