22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयचेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी

चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी

१७२ प्रवाशांच्या जीवाशी खेळ विमान अज्ञात स्थळी हलवले

चेन्नई : चेन्नईहून मुंबईला जाणा-या इंडिगो विमानाबाबत एक मोठी माहिती समोर आली असून शनिवारी सकाळी मुंबईला जाणा-या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी मिळाली. फ्लाइट ६ ई ५३१४ चेन्नईहून सकाळी ७ वाजता उड्डाण केले.

सकाळी साडेनऊच्या सुमारास ते मुंबई विमानतळावर उतरले. विमानतळ अधिका-यांनी तातडीने कारवाई केली. सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप उतरवण्यात आले. सध्या संपूर्ण विमानाचा शोध सुरू आहे. इंडिगोने निवेदन जारी करून म्हटले आहे की, चेन्नईहून मुंबईला जाणा-या इंडिगो फ्लाइट ६ ई ५३१४ ला बॉम्बची धमकी मिळाली आहे. मुंबईत उतरल्यावर क्रूने प्रोटोकॉलचे पालन केले. सुरक्षा एजन्सीच्या सूचनेनुसार विमान निर्जन ठिकाणी नेण्यात आले.

सर्व प्रवासी विमानातून सुखरूप उतरले आहेत. सध्या विमानाचा शोध सुरू आहे. सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर विमान टर्मिनल परिसरात परत आणले जाईल. अलीकडच्या विमानाला बॉम्ब धमकी मिळण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी दिल्लीहून बनारसला जाणा-या विमानालाही अशीच धमकी मिळाली होती. दिल्लीहून श्रीनगरला जाणा-या फ्लाईटमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. आता शनिवारी चेन्नईहून मुंबईला जाणा-या फ्लाइटमध्ये अशीच एक चिठ्ठी सापडली. सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR