34.3 C
Latur
Saturday, May 17, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी

ईमेलमध्ये दहशतवाद्याचा उल्लेख

मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आयडीवर पाठवण्यात आली आहे, ज्यामध्ये मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलमध्ये दावा करण्यात आला आहे की ताज हॉटेल आणि विमानतळाला बॉम्बने उडवले जाईल.

मुंबई विमानतळ आणि ताजमहल पॅलेसला बॉम्बने उडवण्याच्या धमकीच्या ईमेलमुळे खळबळ उडाली आहे. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून तपास सुरू झाला आहे असे सांगितले जात आहे की ईमेलमध्ये दहशतवादी अफजल गुरु आणि सैवक्कू शंकर यांना अन्यायाने फाशी दिल्याचा उल्लेख करत ही धमकी देण्यात आली आहे.

सुरक्षा यंत्रणा सतर्क
धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून संपूर्ण मुंबईत लष्करी दल तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलवर डॉग स्कॉडच्या पथकाने प्रत्येक कोप-याची तपासणी केली आहे. मुंबई पोलिस ईमेल पाठवणा-याचा शोध घेण्यासाठी कार्यरत झाले आहेत. यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती.

लष्कराने दहशतवाद्यांचा बदला घेतला
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेसंदर्भात विशेष खबरदारी घेतली जात आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केली होती. मृतांमध्ये अनेकजण महाराष्ट्रातील होते. भारताने या हल्ल्याचा बदला पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हवाई हल्ले करून घेतला होता. भारतीय लष्कराने पाकिस्तानी हद्दीत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते, ज्यामध्ये १०० हून अधिक लोक मारले गेले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR