सोलापूर प्रतिनिधी : गोवा येथील प्रादेशिक विमान सेवा पुरवणा-या फ्लाय ९१ने गोवा ते सोलापूर दरम्यान थेट उड्डाण सुरू करण्याची घोषणा केली आहे. गोवा-सोलापूर दरम्यानची ही थेट विमानसेवा प्रवाशांसाठी प्रवास अधिक जलद, आरामदायी आणि सुलभ होणार आहे. गोवा-सोलापूर मार्गासाठी बुकिंग आता सुरू झाले असून, तिकिटे फ्लाय ९१च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
यामुळे गोव्याच्या समृद्ध पर्यटनाला आणि सोलापूरच्या धार्मिक व औद्योगिक वैशिष्ट्यांना दोन्ही भागांतील प्रवाशांसाठी अधिक सुलभ प्रवास करता येणार आहे. सोलापूर कापड उद्योगासाठी आणि औद्योगिक विकासा सह धार्मिक गोष्ट महत्वाचा जिल्हा आहे. त्यामुळे सोलापूरला येण्यासाठी उद्योजकासह भाविकांसाठी हे विमान प्रवास सुरू झाल्यामुळे उत्तम सोय होणार आहे.
धार्मिक दृष्ट्या पंढरपूर (विठ्ठल-रुक्मिणी मंदिर), तुळजापूर(तुळजा भवानी मंदिर), अक्कलकोट (स्वामी समर्थ महाराज मंदिर), गंगापूर (श्री नरसिंह सरस्वती स्वामी मठ) आणि भीमाशंकर या पाच प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचे प्रवेशद्वार मानले जाते. त्यामुळे सोलापूर हे औद्योगिक आणि धार्मिक वारशाचा संगम असलेला जिल्हा आहे. सोलापूर हे केवळ एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र नाही, तर महाराष्ट्राच्या तीर्थक्षेत्र सर्किटमधील एक प्रमुख धार्मिक केंद्र देखील आहे. या विमानसेवेमुळे यात्रेकरूंना तसेच व्यवसाय आणि आरामदायी प्रवास करणा-यांना या प्रदेशात सहज आणि सुरक्षित प्रवास करता येणार आहे.