24.1 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeराष्ट्रीयसीमेवर जवानांनी पकडली १२० क्विंटल साखर

सीमेवर जवानांनी पकडली १२० क्विंटल साखर

गुवाहाटी : भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी १२० क्विंटल साखर जप्त केली आहे. देशातून साखरेची निर्यात बंद असताना देखील साखरेची बांगलादेशात तस्करी होत असल्याचे उघड झाला आहे. दरम्यान, आता भारत-बांगलादेशच्या सीमेवर जप्त केलेली साखर नेमकी कोणाची? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी भारत-बांगलादेश सीमेवर आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदी पात्रात साखरेच्या पोत्यांनी भरलेली बोट जप्त केली आहे. १२० क्विंटल एवढी साखर जप्त करण्यात आली आहे. बीएसएफ गुवाहाटीने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. एक डिसेंबरपासून ११ डिसेंबरच्या कालावधीत तिस-यांदा तस्करीचा हा प्रयत्न जवानांनी हाणून पाडला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR