16.8 C
Latur
Friday, December 13, 2024
Homeराष्ट्रीयपाक, बांगलादेशच्या सीमा होणार सुरक्षित

पाक, बांगलादेशच्या सीमा होणार सुरक्षित

नवी दिल्ली : फाळणीनंतर प्रथमच भारताने पाकिस्तान आणि बांगलादेशला लागून असलेल्या सीमा सुरक्षा संदर्भात योजना आखण्यात येत आहे. पुढील दोन वर्षात पाकिस्तान आणि बांगलादेशसोबतच्या देशाच्या सीमा पूर्णपणे सुरक्षित असेल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ५९ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

अमित शहा म्हणाले की, भाजप २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमेवरील सुमारे ५६० किमी अंतरावर कुंपण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पुढील २ वर्षांत या दोन्ही देशांच्या सीमेवरील सुमारे ६,३८६ किमी लांबीचे कुंपण जोडण्यासाठी योजना आखण्यात येत आहे.

भारत-पाकिस्तानमधील २२९० किमी आणि भारत-बांगलादेशमधील सुमारे ४०९६ किमी पसरलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर भेडसावणा-या आव्हानांवर शहा यांनी भाष्­य केले. नदी, सीमेवर डोंगराळ भाग आणि दलदलीच्या भागांसह वैविध्यपूर्ण भूप्रदेश आहेत. ज्यामुळे कुंपण उभारणे आव्हानात्मक होत आहे. घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफ आणि इतर एजन्सीद्वारे या सीमाभागात तांत्रिक उपकरणे वापरणे हे देखील आव्हानात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बीएसएफ जवानांच्या प्रयत्नांची प्रशंसा
अमित शहा यांनी विविध राष्ट्रीय कामगिरीचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला दिले. तसेच त्­यांनी बीएसएफच्या प्रयत्नांची प्रशंसा देखील केली. बीएसएफ जवानांचे महत्त्व आणि त्यांची वचनबद्धता अधोरेखित केली. या दोन्ही देशांतील आंतरराष्ट्रीय सीमेवरील कुंपण उभारणे फायद्याचे ठरेलच; पण देशाचे रक्षण शूर बीएसएफ जवानच करू शकतात, असेही शहा यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR