22 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeराष्ट्रीयसंसदेच्या दोन्ही सभागृहांचे काम स्थगित

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे काम स्थगित

सत्ताधारी घाबरल्याचा विरोधकांचा आरोप

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. अधिवेशन संपत असतानाच भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार शाब्दीक चकमक झाली. कामकाजाला सुरुवात होताच, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कथित अपमानावरून विरोधी खासदारांनी गदारोळ सुरू केला.

त्यामुळे लोकसभेसह राज्यसभा स्थगित करण्यात आली. या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, शुक्रवारी लोकसभेचे कामकाज सुरू होताच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून विरोधी खासदारांनी गदारोळ सुरू केला. या गदारोळातच देशात एकाच वेळी निवडणुका घेण्याशी संबंधित दोन विधेयके संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदारांना आपापल्या बसण्यास सांगितले. सभागृहात राष्ट्रगीत झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज संस्थगित करण्यात आले. राज्यसभेतही कामकाज सुरू झाल्यानंतर अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून विरोधी पक्षांनी शुक्रवारी गदारोळ केला. या प्रचंड गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज सुरुवातीला दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. यानंतर ते संस्थगित करण्यात आले. तत्पूर्वी, विरोधी पक्षाच्या खासदारांनी शुक्रवारी विजय चौकात एकत्र येऊन निदर्शने केली.

ही बाब राष्ट्रहिताशी निगडीत
काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. हे सरकार घाबरले आहे. हे सरकार अदानी प्रकरणावर चर्चा करायला घाबरते. कोणत्याही चर्चेला घाबरते. डॉ. आंबेडकर यांच्याबद्दलच्या त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, हे आता उघड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्याने त्यांना भीती वाट आहे. ही बाब राष्ट्रहिताशी निगडीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, देशातील जनता आणि स्वातंत्र्यलढ्यामुळे आपली राज्यघटना मिळाली आहे. त्यामुळे त्यांचा असा अपमान देश सहन करणार नाही, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR