35.9 C
Latur
Saturday, March 14, 2026
Homeमहाराष्ट्रनरेंदर आणि सिलिंडर दोन्ही गायब

नरेंदर आणि सिलिंडर दोन्ही गायब

भाजपने अदानींना सर्व काही विकले संजय राऊत यांची टीका

मुंबई : भाजपने सर्व काही अदानींना विकले फक्त काही नदी नाले शिल्लक होते त्यातील मिठी नदी, मोदींनी जी योजना सांगितली आहे की गटारातून गॅस काढला पाहिजे, ही मिठी नदीच्या माध्यमातून साकार होऊ शकते. आता गटारांची किंमत आता वाढली आहे.

संजय राऊत म्हणाले की, भाजपकडून गटारांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करा अशी सांगण्याची स्थिती दिसते आहे. आम्ही मोदींच्या योजनेला पाठिंबा देत आहोत. भाजप मोदी यांच्या विरोधात कधीपासून जात आहे? नरेंदर आणि सिलिंडर भी गायब अशी घोषणा संसदेत गाजत आहे. यापुढे नरेंद्र मोदी संसदेत येतील असे वाटत नाही कारण त्यांना तोंड दाखवायला जागा नाही.

मोदी यावर बोलत नाही
संजय राऊत म्हणाले की, अखाती देशातील युद्धामुळे भारताला अत्यंत गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. पण सरकारकडून त्या संदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत की सर्व काही अलबेल आहे. एलपीजीची टंचाई अजिबात पडणार नाही, भारत सर्व परिस्थितीशी तोंड द्यायला सक्षम आहे. कुठेही सिलिंडरचे भाव वाढणार नाही. या अफवा महाराष्ट्राचे आणि केंद्राचे सरकार पसरवत आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू अशा राज्यात प्रचारात अडकलेले आहे. त्यांच्या प्रचार सभेतील कोणत्याही भाषणात या विषयाचा उल्लेख नाही.

एलपीजी अभावी अनेक हॉटेल्स बंद
संजय राऊत म्हणाले की, सिलिंडरसाठी रांगा लागलेल्या आहेत. २५ दिवस सिलिंडर मिळणार नाही असे चित्र आहे. अनऑर्गनाईज लेबर जाक हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे ती हॉटेल इंडस्ट्री ४० टक्के बंद झाली आहे. मुंबईसारख्या मोठ्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये एलपीजी अभावी हॉटेल्स बंद आहेत, त्यामुळे रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री एक शब्द बोलत नाही, लोकांनी काय करायचे.नोटबंदीच्या वेळी लाइनमध्ये लोकं मारली गेली. तेच सिलिंडरच्या रांगेत होईल अशी परिस्थिती देशभरात झाल्याचे दिसते आहे.

हे सरकार जनताविरोधी
संजय राऊत म्हणाले की, हे सरकार जनताविरोधी आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात अपयशी ठरल्याने आपल्या देशावर ही परिस्थिती ओढावली आहे. इराणकडून संवाद झाला असे सांगितले जात नाही. केंद्र सरकारकडून अफवा पसरवल्या जात आहेत. इराणसोबत संवाद साधला गेला पाहिजे. इराणला नैतिक पाठबळ देणे गरजेचे आहे. युद्ध युद्धांच्या ठिकाणी आहे, पण आपण तटस्थ भूमिका घेणे गरजेचे होते. इराणच्या दुखात सहभागी होणं गरजेचे होते. केवळ तेलाचे टँकर सोडा इतकाच आपला संबंध आहे का तर नाही? असे राऊतांनी म्हटले आहे.