22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयबॉयकॉट मालदीव हॅशटॅग ट्रेंडमध्ये

बॉयकॉट मालदीव हॅशटॅग ट्रेंडमध्ये

मोदींच्या दौ-यानंतर सोशल मीडियावर ट्रेंड मालदीवच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौ-यानंतर सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजे आधीच्या ट्विटरवर बॉयकॉट मालदीव हॅशटॅग ट्रेंड होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच लक्षद्वीपला भेट दिली. या दौ-यातील काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वीच ‘लँड ऑफ कोरल्स’ लक्षद्वीपला भेट दिला. यानंतर भारताचा सुंदर समुद्रकिनारा लक्षद्वीप चर्चेत आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये ते स्रॉर्कलिंग करताना दिसत होते. यासोबत पांढ-या वाळूवर चालताना आणि समुद्रकिना-यावर विश्रांती घेतानाचे फोटोही पंतप्रधानांनी शेअर केले होते. पंतप्रधानांची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लगेचच, भारतात लक्षद्वीप ट्रेंड होऊ लागला.

लक्षव्दीप सर्वाधिक शोधलाय
पंतप्रधानांची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लक्षद्वीप हा भारतात गुगलवर सर्वाधिक शोधला जाणारा दहावा शब्द बनला. पंतप्रधानांचे फोटो पाहून नेटक-यांनी लक्षद्वीपबद्दल माहिती शोधण्यास सुरुवात केली. इतकंच काय तर, नेटिझन्सने लक्षद्वीपची मालदीवशी तुलना करण्यास सुरुवात केली. यानंतर अनेक नेटिझन्सने कमेंट करत सांगितले की, लक्षद्वीपचा समुद्रकिनारा सुट्टीसाठी मालदिवपेक्षा चांगला पर्याय असू शकते. अलिकडच्या काळात सेलिब्रिटी आणि दिग्गज नेते मंडळींसह अनेक नागरिक सुट्ट्यांसाठी मालदिवला पसंती देताना दिसतात. त्यामुळे मालदीवला प्रसिद्धी मिळाली आहे.

मालदीवच्या खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
भारतीय बेटाची वाढती चर्चा आणि लोकप्रियता मालदीवच्या एका खासदाराला मात्र पटली नाही. मालदीवचे खासदार जाहिद रमीझ यांनी पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौ-याच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, त्यांच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना एक भ्रम आहे. झाहिद रमीझ यांनी वर वादग्रस्त कमेंट केली की, खोल्यांमधील कायमचा वास हा भारतासाठी सर्वात मोठी पडझड असेल. यानंतर लक्षद्वीपबाबत केलेल्या या वादग्रस्त टिप्पणीबद्दल एका भारतीय ट्विटर युजरने मालदीवच्या राजकारण्याला फटकारले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR