24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रपेपर तपासणीवरील बहिष्कार अखेर मागे

पेपर तपासणीवरील बहिष्कार अखेर मागे

पेपर तपासणीवरील बहिष्कार अखेर मागे

मुंबई : प्रतिनिधी
जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारने दिलेल्या आश्वासनामुळे एक नोव्हेंबर २००५ पूर्वी दिलेल्या जाहिरातीद्वारे सेवेत आलेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबरोबरच वाढीव पदावरील प्रलंबित असलेल्या २५३ शिक्षकांच्या त्रुटींची पूर्तता केली असून वित्त विभागाच्या सहमतीने लवकरच त्यांच्या समायोजनाचा आदेश काढण्यात येईल, असे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे १२ वीचे पेपर तपासणीचा बहिष्कार मागे घेण्यात आला.

२००१ पासून आयटी विषयाच्या मान्यताप्राप्त शिक्षकांना वेतनश्रेणी मिळण्याबाबतचा प्रश्न प्रलंबित होता. त्याबाबत आयटी विषयाच्या शिक्षकांची शैक्षणिक अर्हता लक्षात घेऊन मान्यताप्राप्त शिक्षकांच्या रिक्त पदावर त्यांचे समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिक्षकांचे समायोजन ६० दिवसांत करण्यात येईल, असे सांगण्यात आले. तसेच शासकीय कर्मचा-यांप्रमाणे शिक्षकांना १०, २०, ३० वर्षांची सुधारित सेवांतर्गत वेतनश्रेणी देण्याची योजना शिक्षकांना लागू करण्याबाबत वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला, अशी माहिती शिक्षण विभागाने महासंघाला दिली.शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षण विभागाने २१ हजार ६७८ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे तर उर्वरित पदे लवकरच भरण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

उर्वरित मागण्यांसाठी १५ दिवसांत बैठक
महासंघाच्या उर्वरित मागण्यांबाबत शिक्षण विभागातर्फे आगामी १५ दिवसांत बैठक घेण्यात येणार आहे, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले. शिक्षण विभागातर्फे मान्य मागण्यांची अंमलबजावणी विनाविलंब करावी, अशी अपेक्षा प्रा. पूर्णपात्रे यांनी व्यक्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR