24.9 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये महायुतीत बिघाडी

नाशिकमध्ये महायुतीत बिघाडी

शिवसेनेला पाठिंबा द्यावा, मुख्यमंत्र्यांचा भावसार यांना फोन

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २६ जूनला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून बैठकांचा धडाका सुरू आहे तर महायुतीत शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणात असल्याने महायुतीत बिघाडी झाली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी नाशिक दौ-यावर असताना त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार ऍड. महेंद्र भावसार यांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने किशोर दराडे यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने महेंद्र भावसार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली तर विवेक कोल्हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या चौरंगी लढतीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

नाशिकमध्ये महायुतीचे दोन उमेदवार आमनेसामने आहेत. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी नाशिक दौ-यावर होते. नाशिक दौ-यावर असताना मुख्यमंत्र्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार महेंद्र भावसार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. निवडणुकीतून माघार घेऊन शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांना मदत करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी महेंद्र भावसार यांना केल्याचे समजते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतरही महेंद्र भावसार हे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती मिळत आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR