15.6 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeअंतरराष्ट्रीयब्रिटन बेकायदेशीर स्थलांतरितांना रोखणार

ब्रिटन बेकायदेशीर स्थलांतरितांना रोखणार

ब्रिटनमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांच्या संख्येत वाढ सुनक सरकार आणतेय नवा कायदा

लंडन : ब्रिटनमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांना त्यांच्याच पक्षांनी घेरले आहे. त्यामुळे सुनक सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांना देशात येण्यापासून रोखण्यासाठी सुनक सरकारने गुरुवारी नवीन कायदा आणला. नवीन कायद्यांनुसार ब्रिटन व्हिसा-पासपोर्टशिवाय सागरी मार्गाने बेकायदेशीरपणे येणा-या स्थलांतरितांना रोखणार आहे.

स्थलांतरितांचे आगमन फायदेशीर आहे परंतु व्यवस्थेचा गैरवापर होऊ नये दूर करणे खूप महत्वाचे असल्याचे पंतप्रधान सुनक यांनी म्हटले आहे. नवीन नियम आणि कडक उपायांवर त्यांनी भर दिला आहे. नवीन नियमांनुसार ब्रिटनला जाणारे स्थलांतरित कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सोबत घेऊन जाऊ शकणार नाहीत. याशिवाय व्यवसायांना दिलेली २० टक्के पगार सवलतही मिळणार नाही. गेल्या वर्षभरात सात लाखांहून अधिक लोक ब्रिटनमध्ये गेले आहेत. नवीन नियमांनुसार हे स्थलांतर तीन लाखांपर्यंत कमी करण्याचे ब्रिटिश सरकारचे उद्दिष्ट आहे.

राष्ट्रीय हितासाठी कायदा आवश्यक
बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुद्यावर बोलताना ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले, आज सरकारने आतापर्यंतचा सर्वात कठोर बेकायदेशीर इमिग्रेशन कायदा आणला आहे. मला माहित आहे की यामुळे काही लोकांची निराशा होईल. तुम्हाला याबद्दल खूप टीका ऐकायला मिळेल. मात्र अवैध स्थलांतरितांच्या प्रवेशावर बंदी घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्रिटन आणि सुरक्षा प्रदान करतो
ते पुढे म्हणाले, मी देखील स्थलांतरितांचा मुलगा आहे. लोक ब्रिटनमध्ये येतात कारण ब्रिटन हा एक अद्भुत देश आहे. ब्रिटन लोकांना संधी देते, आशा आणि सुरक्षा प्रदान करतो. पण फरक असा आहे की माझे कुटुंब येथे कायदेशीररित्या आले आहे. बहुतेक स्थलांतरितांप्रमाणे ते स्थानिक समुदायात समाकलित झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR