परभणी : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाच्या संघास कांस्य पदक मिळाले.
अमरावती येथील क्रीडा संकुलात २२ ते २४ ऑक्टोबर दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत मुंबई, नाशिक, कोल्हापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती, नागपूर विभागातील संघानी सहभाग घेतला होता. सदरील स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर विभागाचे नेतृत्व श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने केले होते. या स्पर्धेत महाविद्यालयाने तिस-या क्रमांकासाठी नाशिक विभागाचा ५ गुणांनी पराभव करून छत्रपती संभाजीनगर विभागास कास्य पदक प्राप्त करून दिले.
सदरील संघात साक्षी चव्हाण (कर्णधार), अक्षरा नरवडे, रिचा नवसुपे, दिव्या श्रीखंडे, सानिया गायकवाड, मयूर मस्के, अंजली शेळके, चंचल गायकवाड, दिव्या चौरंगे, मयुरी जावळे, आश्विनी जावळे, भाग्यश्री वावळे आदींचा सहभाग होता. उत्कृष्ट खेळ खेळणारी रिचा नवसुपे हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. संघास डॉ. संतोष कोकीळ, प्रा. राजेसाहेब रेंगे यांचे मार्गदर्शन लाभले.
संघाच्या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ. प्रकाश सोळंके, सरचिटणीस आ. सतीश चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशेट्टी, डॉ. रोहिदास नितोंडे, प्रबंधक विजय मोरे, उपप्राचार्य आप्पाराव डहाळे, उपप्राचार्य प्रा.नारायण राऊत तसेच गणेश गरड यांनी संघातील खेळाडूचे अभिनंदन केले.