29.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeसोलापूरबीआरएस सोलापूर लोकसभा लढविणार

बीआरएस सोलापूर लोकसभा लढविणार

सोलापूर- तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाच्यावतीने सोलापूर लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. भारत राष्ट्र समितीची बैठक पक्षाच्या कार्यालयात जिल्हा समन्वयक माउली जवळेकर, शहराध्यक्ष दशरथ गोप, सचिन सोनटक्के, बार्शी तालुका समन्वयक संतोष बोरा, मोहोळ तालुक्याचे उमाटे, माजी नगरसेवक संतोष भोसले, उद्योजक जयंत होले-पाटीलयांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

या बैठकीत कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार केला. प्रारंभी माजी खासदार धर्मण्णा सादल व शिवशंकर मरगल यांच्या निधनानिमित्त श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक ज्येष्ठ नेते नागेश वल्याळ यांनी केले. माजी मुख्यमंत्री व पार्टीचे सर्वेसर्वा केसीआर व प्रमुख नेते हरीश राव यांनी सध्याची राजकीय परिस्थिती व पक्षाच्या पुढील ध्येयधोरणाविषयी कार्यकत्र्यांसाठी दिलेला संदेश व मार्गदर्शनाप्रमाणे जनमानसात पार्टीचा विस्तार करण्यासाठी आपण सर्वजण एकजुटीने काम करण्यासाठी झटले पाहिजे तसेच सर्वांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. आपण लवकरच जिल्हा व शहर पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करणार आहोत, असे शहराध्यक्ष गोप यांनी सांगितले.

यापुढे जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आक्रमकतेने पुढाकार घेऊन काम केले पाहिजे. त्यासाठी प्रसंगी मोर्चा, घेराव, धरणे आंदोलने करावे लागतील, अशा सूचना अनिल बर्वे, सागर कोळी, गणेश खंडाळकर, प्रशांत वायकसकर, मनीष गायकवाड, पाटसकर, अमृतदत्त चिनी यांनी मांडल्या. या बैठकीस शहानवाज शेख, आनंद सिंगराल, श्रीधर चिट्याल, प्रकाश मरगल, भास्कर पसूल, श्रीनिवास गड्डूम, विश्वनाथ मेरगू, विजय गुल्लापल्ली उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR