22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयबीएसएफची पहिली महिला स्रायपर सीमेवर तैनात

बीएसएफची पहिली महिला स्रायपर सीमेवर तैनात

५६ पुरुष कमांडोंमध्ये ठरली अव्वल इंदूरमध्ये घेतले प्रशिक्षण

इंदूर : सीमा सुरक्षा दलाच्या उपनिरीक्षक सुमन कुमारी यांनी इतिहास रचला असून सुमन कुमारी सीमा सुरक्षा दलाची पहिली महिला स्रायपर ठरली आहे. तिने अलीकडेच सेंट्रल स्कूल ऑफ वेपन्स अँड टॅक्टिक्स(सीएसडब्ल्यूटी), इंदूर येथे आठ आठवड्यांचा स्रायपर कोर्स पूर्ण केला. तसेच ट्रेनर ग्रेड मिळवला. सुमन प्रशिक्षणासाठी इंदूरला पोहोचली तेव्हा ५६ पुरुषांमध्ये ती एकटी होती. मात्र तिची जिद्द आणि चिकाटी कमालीची होती. जेव्हा निकाल आला ते सुमन कुमारी सर्वात समोर उभी होती.

बीएसएफ सीएसडब्ल्यूटी इंदूरने एका पोस्टद्वारे सुमनचे यशाची माहिती दिली आहे. बीएसएफ ख-या अर्थाने सर्वसमावेशक शक्ती बनत आहे, जिथे महिला सर्वत्र वेगाने प्रगती करत आहेत. या दिशेने पाऊल टाकत बीएसएफला कठोर प्रशिक्षणानंतर पहिली महिला स्रायपर मिळाली आहे. पंजाबमध्ये प्लाटूनचे नेतृत्व करत असताना सीमापार स्रायपर हल्ल्याचा धोका पाहून सुमनने स्रायपर बनण्याचा विचार केला. तिने स्रायपर कोर्स करायचे ठरवले. सुमनची जिद्द पाहून तिच्या वरिष्ठ अधिका-यांनी तिला स्रायपर कोर्स करण्यास मान्यता दिली. विशेष म्हणजे स्रायपर कोर्स करणा-या ५६ पुरुषांमध्ये सुमन ही एकमेव महिला होती. तिच्या या कामगिरीमुळे ती इतर महिला भरतींना अशाच लष्करी भूमिका घेण्यासाठी प्रेरित करेल अशी अपेक्षा आहे.

स्नायपर कोर्स सर्वांत कठीण
सीएसडब्ल्यूटीचे आयजी भास्कर सिंह रावत म्हणाले की, कमांडो प्रशिक्षणानंतर स्रायपर कोर्स हा सर्वात कठीण आहे. रावत यांनी सुमनच्या कर्तृत्वाचे कौतुक केले आणि ती आता स्रायपर प्रशिक्षक म्हणून नियुक्त होण्यास पात्र असल्याचे सांगितले.

मानसिक ताकदीची होती गरज
स्रायपर कोर्ससाठी खूप शारीरिक आणि मानसिक ताकद लागते. या वर्षी अशी अनेक प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात आली होती, ज्यात एकाग्रता आवश्यक होती जेणेकरून स्रायपर ओळख लपवून शत्रूच्या जवळ जाऊ शकेल.

शिकण्याच्या इच्छेने वेगळे बनविले
बहुतेक पुरुष प्रशिक्षणार्थींना हे प्रशिक्षण कठीण वाटते आणि ते कोर्स करण्याचा प्रयत्न देखील करत नाहीत, परंतु सुमनने स्वेच्छेने काम केले. मला सांगायला आनंद होत आहे की अभ्यासक्रमादरम्यानच्या अनेक उपक्रमांमध्ये सुमनने पुढाकार घेतला. तिची मेहनत, जिद्द आणि शिकण्याची इच्छेने तिला वेगळे बनवले, असे प्रशिक्षकाने सांगितले आहे.

कोण आहे बीएसएफ उपनिरीक्षक सुमन?
हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील रहिवासी असलेली सुमन एका सामान्य कुटुंबातून येते. तिचे वडील इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात आणि आई गृहिणी आहे. ती २०२१ मध्ये बीएसएफमध्ये रुजू झाली. निशस्त्र युद्धातही तो पारंगत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR