सोलापूर : सोलापूराहून हैदराबादकडे जाणा-या बल्कर वाहनाने रस्त्यावरून जाणा-या दुचाकीना धडक दिली.दुचाकीस्वारांना धडक दिल्यानंतर दुभाजक ओलांडून बल्कर विरुद्ध दिशेला असलेल्या गॅरेजवर आदळली. या अपघातात तिघांचा दुर्दैवी अंत झाला, तर चौघे गंभीररित्या जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार गंभीर जखमी असलेल्या चौघाना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयकडे रवाना करण्यात आले आहे. बल्कर गॅरेजवर आदळल्याने आत कोणी अडकले का याचा तपास सध्या पोलीस करतायत. घटनास्थळी पोलिस, राष्ट्रीय महामार्गचे बचाव पथक आणि सामाजिक कायकर्ते बल्कर हटवण्यासाठी प्रयत्न करतायत. विवेकानंद लिंगराज, आसिफ बागवान, तोहीद कुरेशी असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मयत विवेकानंद उर्फ विवेक लिंगराज हे सोलापूर जिल्हा परिषद कामगार संघटनेचे नेते होते. त्यांच्या मृत्यूची बातमी कळतच सोलापूर शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी झाली.