19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeधाराशिवघरफोडी व चोरीतील आरोपी गजाआड

घरफोडी व चोरीतील आरोपी गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : ३ लाख ६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव शहरासह विविध गावात घरफोडी करणा-या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १० ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून चोरी केलेल्या ५ दुचाकीसह ३ लाख ६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शरद हरिदास गुंड (वय ३९, रा. पाडोळी आ., ह. मु. किंग्ज गार्डन मागे धाराशिव) यांच्या घराचा कडी-कोयंडा अज्ञात व्यक्तीने २३ जुलै रोजी तोडून घरातील कपाटातून २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे किंमत ४५ हजार रूपये चोरुन नेले. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा करताना आरोपी हे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले होते. सर्व प्रसारमाध्यमे तसेच व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर त्यांच्या चोरी करतानाच्या व्हिडीओ व्हायरल झालेल्या होत्या. त्यामुळे लोकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालेले होते. सदरच गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीकोनातून योग्य त्या सूचना दिल्या.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांचे पथक गुन्हा उघडकीस आणण्याकरीता रवाना झाले. यावेळी पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पोलीस ठाणे बेंबळी व इतर ठिकाणी घरफोड्या व चो-या या सराईत गुन्हेगार अक्षय बाळू शिंदे (रा. सुंभा ह. मु. लासोना ता. धाराशिव) याने व त्याच्या इतर साथीदारांनी मिळून केल्या असल्याची बातमी मिळाली. परंतु, सदरचा आरोपी हा डोंगर भागात, रानामाळात, निर्मणुष्य ठिकाणी राहणारा व वेळोवेळी राहते ठिकाण बदलणारा असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या सध्या राहत्या ठिकाणाची माहिती काढून सापळा रचला व त्यास लासोना शिवारातील साठवण तलावाच्या पाळुच्या बाजूस केलेल्या पालीतून १० ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. त्यास गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने त्याच्या इतर ४ साथीदार यांच्या मदतीने पाडोळी तसेच पळसप, कोल्हेगाव, कोंड, राजुरी, धाराशिव शहरासह इतर ७ ठिकाणी घरफोडी केल्याचे कबूल केले.

तसेच त्याने ५ मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली. सदर घरफोडीच्या गुन्ह्यातील त्याच्या वाटणीस आलेले ५ तोळे सोन्याचे दागिने त्याच्या ताब्यातून जप्त केले. तसेच धाराशिव जिल्ह्यातील ३ चोरी केलेल्या मोटार सायकल व सोलापूर जिल्ह्यातील २ मोटार सायकल अशा ५ मोटार सायकली जप्त केल्या. तसेच पथकाने नमुद आरोपीकडून धाराशिव जिल्ह्यातील ८ घरफोडीचे केलेले गुन्हे व ५ मोटार सायकल चोरी केलेल्या गुन्ह्यातील ३ लाख ६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. नमूद आरोपीस पुढील कार्यवाही कामी ढोकी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि अमोल मोरे, सचिन खटके, पोलीस हावलदार विनोद जानराव, हुसेन सय्यद, समाधान वाघमारे, पोलीस नाईक नितीन जाधवर, बबन जाधवर, रविंद्र आरसेवाड, चालक पोह. महेबुब अरब, चालक पोलीस अंमलदार प्रशांत किवंडे, प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने केली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR