अलिबाग : प्रतिनिधी
मुंबई-पुणे दृतगती मार्गावर बस २० फूट खड्ड्यात कोसळली. यात ११ प्रवासी जखमी झाले. जखमींना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खोपोलीजवळ गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. खाजगी बस सांगोला येथून मुंबईच्या दिशेने येत होती.
यावेळी कोंंबड्यांची वाहतूक करणा-याने या बसला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे बसचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस बॅरिअर तोडून २० फूट खड्ड्यात कोसळली. या दर्घटनेत ११ जण जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस, आयआरबी, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीला टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व जखमींना बसमधून बाहेर काढत, उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. कोंबड्यांची वाहतूक करणा-या टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती आहे. खोपोली पोलिस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.