22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रधारावीत धावत्या बसला  आग

धारावीत धावत्या बसला  आग

मुंबई : धारावी जंक्शन परिसरात नवी मुंबईच्या बसला आग लागल्याचे वृत्त आहे. ही बस पनवेलच्या दिशेने जात होती. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले.

धारावी जंक्शन परिसरात आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. १०५ नंबरची ही बस वांद्रे येथून नवी मुंबईतील पनवेलच्या दिशेने जात होती. अचानक या धावत्या बसच्या मागच्या भागात अचानक आग लागली. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली, त्याचे कारण काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

आग लागल्याचे समजताच बसचालकाने प्रसंगावधान दाखवत बसमधील सर्व प्रवाशांना तातडीने सुखरूपरीत्या खाली उतरवले, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी येईपर्यंत बसचालक आणि वाहक या दोघांनी इतर बसचालकांकडून मदत मागत, फायर इन्स्ट्रुमेंट्सचा वापर करत आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR