24.5 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रबसचालक मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

बसचालक मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी

मुंबई : कुर्ला येथे सोमवारी रात्री बेस्ट बसचा मोठा अपघात झाला. भरधाव बेस्ट बसने दिलेल्या धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला असून ४९ पेक्षा जास्त जखमी झाल्याची माहिती आहे. बेस्ट अपघाताची सविस्तर चौकशी करण्यासाठी वाहतूक विभागाचे मुख्य व्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.

तसेच या अपघातामधील मृतांच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून रुपये २ लाख रुपये बेस्ट उपक्रमामार्फत जाहीर करण्यात आले आहेत. तसेच जखमींवर औषधोपचारांचा खर्च मुंबई महानगरपालिका व बेस्ट उपक्रम यांच्यामार्फत केला जाणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे. याच दरम्यान, न्यायालयाने या अपघातातील बसचालक संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR