नागपूर-भोपाळ महामार्गावरील बरेठा घाटाजवळ आज (शनिवारी) सकाळी होमगार्ड आणि पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 21 जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटे चारच्या सुमारास ट्रकला ओव्हरटेक केल्याने हा अपघात झाला आहे.
छिंदवाडाहून राजगढला जाणाऱ्या या बसमध्ये ४० जण होते, ज्यात ३४ होमगार्ड शिपाई आणि ६ पोलीस होते. अपघातात 21 जण जखमी झाले असून 12 जणांना किरकोळ जखमींना आरोग्य केंद्र शाहपूर येथे दाखल करण्यात आले असून 9 गंभीर जखमी जवानांना जिल्हा रुग्णालयात बैतुल येथे दाखल करण्यात आले आहे.
बसमध्ये प्रवास करणारे पोलीस शिपाई अशोक कुमार कौरव यांनी सांगितले की, आम्ही निवडणूक ड्युटी करून परतत होतो, आमच्यासोबत 34 होमगार्ड आणि 6 पोलीस बसमध्ये प्रवास करत होते. वाटेत चहा पिऊन आम्ही राजगडच्या दिशेने निघालो तेव्हा बरेठा घाटात ट्रकला धडकल्यानंतर बस खड्ड्यात पलटी झाली.