25.5 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्रअपघात झाल्यास बस मालकही जबाबदार

अपघात झाल्यास बस मालकही जबाबदार

खासगी वाहनांसाठी नवीन कायदा येणार?

मुंबई : खासगी लक्झरी बसला अपघात झाल्यास मालकही दोषी ठरणार आहे. भीषण अपघाताची जबाबदारी चालकाबरोबरच मालकावरही टाकणारा प्रस्ताव परिवहन विभागाने केंद्राला प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावावरुन वाद निर्माण होणार आहे. केंद्र सरकारच्या हिट अँड रनचा नवीन कायद्याला देशभरातील ट्रक चालकांनी विरोध केला आहे. त्याचवेळी अपघाताची जबाबदारी मालकावर टाकण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला आहे. बस मालक चालकाला आठ-दहा तास गाडी चालवण्यास भाग पाडतात. तसेच नादुरुस्त बस रस्त्यावर उतरवल्या जातात. यामुळे या पद्धतीचा कायदा आणण्याचा हालचाली सुरु आहे.

महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात खासगी लक्झरी बसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या गाड्या रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या मार्गावर धावत असल्याने अपघात झाल्यास अनेक प्रवाशांचे बळी जातात. आतापर्यंत या अपघाताला केवळ चालकालाच दोषी ठरवले जात होते. मात्र अनेकदा नादुरुस्त गाडी, ओव्हरलोड गाडी चालकाला चालवण्यास मालकवर्ग भाग पाडतात. यामुळे अपघात झाल्यास केवळ चालकालाच दोषी न ठरवता मालकालाही दोषी ठरवले जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या परिवहन विभागाने तयार करून मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे पाठवला आहे.

मालकास फायदा पण चालकास पगार नाही
राज्यात ८० हजारहून अधिक खासगी लक्झरी बस धावत आहे. या गाड्यांनी दररोज पाच-सहा लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे मालकांना दररोज लाखो रूपयांचा नफा मिळतो, परंतु चालकांची मासिक १५ ते २० हजार रुपये वेतनावर बोळवण केली जाते. अनेकदा एकाच चालकाला आठ-दहा तास गाडी चालवण्यास भाग पाडले जाते, नादुरुस्त बस रस्त्यावर उतरवल्या जातात. त्यामुळे चालकाबरोबर मालकालाही जबाबदार धरणारा स्वतंत्र प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR