27.6 C
Latur
Monday, April 22, 2024
Homeसोलापूरसिंचन क्षेत्र वाढवून दक्षिण तालुका सुजलाम-सुफलाम् करू

सिंचन क्षेत्र वाढवून दक्षिण तालुका सुजलाम-सुफलाम् करू

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात केवळ अठरा टक्के सिंचन क्षेत्र आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाला नाही. तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणे गरजेचे आहे.याकरिता आपण तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सीना-भीमा नदीवर नवीन कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, सीना-भीमा जोडकालवा निर्माण करण्यावर भर देत आहोत. भविष्यात तालुक्यातील शेतीला आणि पिण्यासाठी पाणी कमी पडू नये यासाठी आपण अनेक योजना राबवित असून येणाऱ्या काही वर्षात तालुका सुजलाम सुफलाम करू अशी ग्वाही आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.

राजूर येथे आमदार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून ९ कोटी खर्चातून सीना नदीवर बांधण्यात येणाऱ्या नवीन पूलाच्या बांधकामाचे तसेच इतर दीड कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर सोलापूर बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, माजी सभापती डॉ. चनगोंडा हविनाळे, तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, महिला तालुकाध्यक्ष अंबिका पाटील, हनुमंत कुलकर्णी, मळसिध्द मुगळे,यतीन शहा, संदीप टेळे,सरपंच लक्ष्मण गडदे,राधाकृष्ण पाटील, उमेश मळेवाडी, प्रा. विजयकुमार बिराजदार, उपसरपंच सतीश देवकते, धर्मराज बळ्ळारी, हनुमंतराव बिराजदार, कृष्णप्पा बिराजदार, सिध्दाराम ढंगापुरे, अभिमन्यू पाटील, शिवानंद बिराजदार, भीमाशंकर पाटील आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR