नवी दिल्ली : भारत देश जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता कधी होणार? असा प्रश्न सातत्याने समोर येत आहे. २०३२ पर्यंत भारत जपान आणि जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर २०२४-२८ पर्यंत सरासरी भारताचा जीडीपी हा ६.५ टक्के राहणार आहे. या शतकाच्या अखेरीस भारत जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता होईल. २०८० नंतर भारताचा जीडीपी चीन आणि अमेरिकेपेक्षा जास्त असेल असा अंदाज सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चने आपल्या ताज्या वर्ल्ड इकॉनॉमिक लीग टेबल रिपोर्टमध्ये वर्तवला आहे.
भारताचा जीडीपी चीनपेक्षा ९० टक्के आणि अमेरिकेच्या जीडीपीपेक्षा ३० टक्के जास्त होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. या शतकाच्या अखेरीस भारत जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनेल. भारताचा जीडीपी चीनच्या जीडीपीपेक्षा ९० टक्के आणि अमेरिकेच्या जीडीपीपेक्षा ३० टक्के मोठा असेल असा अंदाज सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चने व्यक्त केला आहे. बिझनेस स्टँडर्डने जाहीर केलेल्या या अहवालानुसार सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चने म्हटले आहे की २०२४ ते २०२८ पर्यंत भारताचा विकास सरासरी ६.५ टक्के दराने होईल, त्यानंतर २०३२ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. २०३२ पर्यंत भारत जपान आणि जर्मनीला मागे टाकून मोठी अर्थव्यवस्था बनेल असेही या अहवालात सांगण्यात आले आहे. तसेच सीईबीआरच्या मते २०८० नंतर, भारत चीन आणि अमेरिकेला मागे टाकून जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनेल.
तरुण लोकसंख्येमुळे विकासाला गती
सीईबीआरच्या मते, भारताची मोठी आणि तरुण लोकसंख्या, वेगाने वाढणारा मध्यमवर्ग, गतिशील उद्योजकता आणि वाढती जागतिक आर्थिक एकात्मता यामुळं आर्थिक विकासाला गती मिळण्यास महत्त्वपूर्ण योगदान मिळणार आहे. दारिद्रय कमी करणे, असमानता, मानवी भांडवल, पायाभूत सुविधांचा विकास तसेच पर्यावरणाशी संबंधित आव्हानांवर भारताला उपाय शोधावे लागतील, असे या अभ्यासात म्हटले आहे.
२०७५ पर्यंत दुस-या क्रमांकावर
यापूर्वी जुलै २०२३ मध्ये, जागतिक गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्सने म्हटले होते की २०७५ पर्यंत भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल. अहवालात असे म्हटले आहे की भारतीय अर्थव्यवस्था मोठी झेप घेईल आणि जपान आणि जर्मनीच्या अर्थव्यवस्थांना मागे टाकेल. मात्र भारत अमेरिकन अर्थव्यवस्थेला मागे टाकून चीननंतर दुसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असे या अहवाल सांगितले आहे.