28.5 C
Latur
Wednesday, October 23, 2024
Homeउद्योग‘कॅम्पा’ने जिंकली बीसीसीआयची स्पॉन्सरशिप!

‘कॅम्पा’ने जिंकली बीसीसीआयची स्पॉन्सरशिप!

मुंबई : कोको – कोला आणि पॅप्सिकोला शह देण्यासाठी भारतीय बाजारात एक नवीन सॉफ्ट ड्रिंक येणार आहे. रिलायन्स रिटेल व्हेंच्युर्सची शाखा एफएमसीजी कॅम्पा हे सॉफ्ट ड्रिंक भारतीय बाजारात उतरवणार आहे. कॅम्पाने नुकतेच बीसीसीआयची केंद्रीय स्पॉन्सरशिप जिंकली याबाबतेच अधिकृत ट्विट बीसीसीआयने प्रसिद्ध केले आहे.

कॅम्पा सोबतच अ‍ॅटमबर्ग देखील बीसीसीआयच्या भारतात होणा-या सामन्यांसाठीचा स्पॉन्सर असणार आहे. ही डील २०२४ ते २०२६ अशा दोन वर्षासाठी असणार आहे. अ‍ॅटमबर्ग टेक्नॉलॉजी ही कंपनी होम अप्लायन्सेस तयार करणारी कंपनी आहे.

मैदानावर भारताच्या सर्व सामन्यात सॉफ्ट ड्रिंक म्हणून फक्त कॅम्पा सर्व्ह केले जाणार आहे. कॅम्पा लाँच होत असतानाच ही डील खिशात टाकल्यामुळे रिलायन्सच्या टायमिंग बाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, याबाबत रिलायन्सने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कॅम्पाने ही डील फक्त पुरूष क्रिकेट संघाच्या सामन्यावेळी नाही तर भारतात होणा-या प्रत्येक सामन्यासाठी केली. त्यामुळे १९ वर्षाखालील आणि महिला क्रिकेट संघाच्या भारतातील मालिकेत देखील कॅम्पाच असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR