पुणे : प्रतिनिधी
सध्या सर्वत्र उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रंग भरू लागला आहे .त्यातच महाराष्ट्रातील निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.मात्र अजूनही काही जिल्ह्यातील मतदार संघात उमेदवार निश्चिती झाली नसल्याचे पाहावयास मिळत आहे .
पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्याबरोबर प्रचाराची रणधुमाळी गतिमान झाली आहे. मतदारांशी संपर्क साधला जातो आहे.मुख्य म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्ति प्रदर्शन करण्यात आले. यामुळे निवडणुकीचे वातावरण तयार होण्यास मदत होते आहे.याबरोबर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात येर्णाया सभामधून एकमेकांवर आरोप आणि टीका करण्यात येत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आणि त्यानंतर माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रचारात आणखी वेग येणार आहे कारण चारही लोकसभा मतदार संघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. तसेच आगामी काळात राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या जाहीर सभांचे आयोजन विधानसभा मतदार संघनिहाय मेळाव्याचे आयोजन कोपरा सभा ,पदयात्रा यावर भर दिला जाणार आहे बारामती लोकसभा मतदार संघात येत्या ७ मे रोजी मतदान होते आहे.त्यामुळे प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू करण्यात आली आहे मतदानाची तारीख लक्षात घेता बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवारांनी प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा प्रचार दौरा पूर्ण करण्यावर आणि मतदारांच्या गाठी भेटी वर भर दिला आहे .