नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी ११ वाजता संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली. या अर्थसंकल्पात त्यांनी विविध क्षेत्रांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा सलग ७ वा अर्थसंकल्प आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर, भाजपच्या तिस-या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी आरोग्य क्षेत्राबाबत मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थसंकल्पात केंद्र सरकारने कर्करोगाच्या रूग्णांना दिलासा दिला आहे.
कॅन्सरच्या ३ औषधांवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे, कॅन्सरची औषधे स्वस्त होणार आहेत. या व्यतिरिक्त, खाद्यपदार्थांची गुणवत्ता सुधारावी म्हणून, देशात नव्या १०० लॅब्स उभारल्या जाणार, असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.