परभणी : शहरातील विविध भागासह ग्रामीण भगातही लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पक्षाकडून नागरीकांशी संपर्क साधण्यात येत आहे. या अनुषंगाने विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरिकांना एकत्र करून त्यांच्याशी संवाद साधला जात आहे.
या कार्यक्रमांमधून मी कोणती कामे केली किंवा कोणती कामे करणार याचा पाढा पक्षांकडून किंवा उमेदवारांकडून वाचला जात आहे. एरवी आपल्या चारचाकी गाड्यांना पडदे किंवा काळ्या रंगाची फिल्म लावून एसी गाडीतून प्रवास करणारे विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी सध्या मात्र नागरिकदिसताच गाडीच्या काचा खाली घेऊन त्यांना स्वत:हून नमस्कार घालताना दिसत आहेत. गाडीच्या काचा खाली घेऊन स्वत:हून नमस्कार घालणा-या या नेते मंडळीबद्दल नागरिकांना आश्चर्य वाटत आहे. एरवी नागरिकांची कोणतीही दखल न घेणारी ही मंडळी सध्या मात्र स्वत:हून नमस्कार घालीत असून ही लोकसभा निवडणुकीची किमया असल्याची कुजबूज नागरिकांतून होताना दिसून येत आहे.