हसन मोमिन
वलांडी बातमीदार : वलांडी ता. देवणी येथून जवळच असलेल्या धनेगाव तांडा पाटी जवळ झालेल्या ट्रक आणि कार च्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार झाल्याची घटना बुधवार दिनांक १० एप्रिल रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली.
पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार धनेगाव तांडा पाटी जवळ निलंगा जाणारी अर्टिगा कार क्रमांक एमपी ०९ डीई ५२२७ आणि वलांडी कडे येणारा ट्रक क्रमांक एम एच २४ जे ७३६५ यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मध्यप्रदेश येथील कापडाचे व्यापारी माही क्रिएशन इंदोर चे मालक संजय जैन, सेल्समन संतोष जैन,माझा शर्ट्स इंदोर चे संजय जैन, चालक सचिन जैन सर्व राहणार इंदोर (मध्यप्रदेश) यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची भीषणता इतकी भयानक होती की इर्टिगा गाडीचा पूर्ण चेंदा मेंदा झाला आहे. घटनेचा पंचनामा देवणी पोलिस ठाण्याचे सपोनि. माणिकराव डोके आणि त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून सर्व मृतदेह वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले असून मयतांच्या सर्व नातेवाईक यांना कल्पना देण्यात आली आहे.