26.1 C
Latur
Sunday, February 2, 2025
Homeपरभणीगॅस कटरने एटीएम फोडून रोकड लंपास

गॅस कटरने एटीएम फोडून रोकड लंपास

पालम : पालम शहरातील गंगाखेड रोडवर असलेल्या शिवनेरी कॉलेज जवळील स्टेट बँकेची एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने तोडून अज्ञात चोरट्यांनी रक्कम लंपास केली. ही घटना शनिवार, दि. १ फेब्रुवारी रोजी रात्री ३ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने पालम शहरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेचे वृत्त कळताच पालम पोलिस निरीक्षक सुरेश थोरात आपल्या सर्व टीमला सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले. याबद्दल वरीष्ठांना माहिती कळवण्यात आली. पोलिस अधीक्षक रवींद्रसिहं परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी समाधान पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेच्या अनुषंगाने योग्य तो तपास करण्याच्या सूचना दिल्या.

दरम्यान एटीएम फोडण्या अगोदर चोरट्यानी एटीएम प्रवेशद्वाराजवळील सीसीटीव्ही कॅमे-यावर काळ्या कलरचा स्प्रे मारल्याचे आढळून आले. घटनेच्या एक दिवस अगोदर एटीएममध्ये २५ लाख रुपयांची रक्कम भरण्यात आली होती अशी माहिती स्टेट बँकेच्या कर्मचा-यांकडून देण्यात आली. परंतु चोरट्यांनी एटीएममधील एकूण किती रकमेवर डल्ला मारला याची पूर्ण माहिती मिळू शकली नाही. पोलिस निरीक्षक सुरेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR