गोवंश छळप्रकरण; वसमत उपनगराध्यक्ष अडचणीत

वसमत : प्रतिनिधी
वसमत तालुक्यातील जवळा खंदारबन शिवारात जनावरांना कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे बांधून त्यांना चारा व पाणी न देता हालअपेष्टा केल्याप्रकरणी वसमत नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान अली यांच्याविरुद्ध अखेर वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आरोपी बदलण्यासाठी पोलिसांवर विविध स्तरातून दबाव आणला जात असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, अखेर रात्री उशिरा मूळ आरोपीवरच गुन्हा नोंद करण्यात आल्याने या प्रकरणाला मोठे राजकीय व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जवळा खंदारबन शिवारातील शेतगट क्रमांक ३२ मध्ये तब्बल १९ जनावरे चारा व पाण्याविना बांधून ठेवण्यात आली होती. यामध्ये गायी, बैल, गोरे व करडांसह सुमारे १ लाख ६३ हजार रुपयांची जनावरे जप्त करण्यात आली. जनावरांशी क्रूर वागणूक दिल्याप्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात सुरुवातीपासूनच आरोपीचे नाव बदलण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा शहरात रंगली होती. याची माहिती मिळताच भाजपा नेते गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज हे आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांसह वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाले. खऱ्या आरोपीवरच गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.

या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. आयजी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी) यांच्यापर्यंतही दूरध्वनीद्वारे माहिती पोहोचल्याचे समजते. त्यानंतर पोलीस प्रशासनाने प्रकरणाचा फेरआढावा घेत अखेर रात्री उशिरा पोलीस कर्मचारी अरीफ बशीर दोसानी यांच्या फिर्यादीवरून उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान अली यांच्याविरुद्धच गुन्हा नोंदविला.

गुन्हा दाखल होण्याच्या प्रक्रियेदरम्यान वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर नागरिक, कार्यकर्ते आणि विविध पक्षिय कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.

या कारवाईमुळे शहरात मोठी चर्चा सुरू असून, कायद्यापुढे सर्व समान असल्याचा संदेश या प्रकरणातून गेल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री निरदोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार विजय उपरे पोलीस करीत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LATUR|एकमतच्या 35 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सत्त्कारमूर्तींच्या प्रतिक्रिया
21:01
Video thumbnail
Nanded|शेतात मोठा खड्डा अन् आत देवीची मूर्ती! नायगावमध्ये नेमकं गूढ काय?
00:52
Video thumbnail
Latur|लातूर RTO मध्ये एजंटची दादागिरी? थेट इन्स्पेक्टरला लाथाबुक्क्यांनी मारहाण!
03:18
Video thumbnail
Latur|शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ‘शुभमंगल’ योजना आणण्याचा प्रयत्न - धिरज देशमुख
08:10
Video thumbnail
CHAKUR|महिला सक्षमीकरणात विशेष योगदान-ज्योतीताई स्वामी
04:32
Video thumbnail
RENAPUR|ग्रामीण प्रशासनातील आदर्श अधिकारी तानाजी यादव
04:43
Video thumbnail
UDGIR|साहित्य शिक्षण ,सांस्कृतिक क्षेत्रात अनिता येलमटे यांचे योगदान
03:05
Video thumbnail
UDGIR|दुष्काळाच्या मातीत शिक्षणाची गंगा प्राचार्य सूर्यकांत चवळे
04:08
Video thumbnail
UDGIR|सेवाभाव,संवेदनशीलता समर्पणाचा आदर्श-डॉ प्रियांका राठोड
02:49
Video thumbnail
UDGIR|गावच्या मातीचा सुगंध बाल भारतीच्या पाठयपुस्तकात रसूल पठाण यांचा प्रेरणादायी प्रवास
04:01
Video thumbnail
RENAPUR|महेबूब शेख यांची बांधकाम क्षेत्रात यशोगाथा
02:24
Video thumbnail
DEVANI|आधुनिक शेतीचा चमत्कार महेश रबशेट्टे
04:35
Video thumbnail
UDGIR|समाजसेवा,शिक्षण आणि सांस्कृतिक दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या प्रा.ज्योती कवडेकर
02:35
Video thumbnail
DEVANI|दुष्काळाच्या मातीतून उद्योगाची भरारी;शेतकरी समृद्धीचा अध्याय-बिभीषण भोसले
03:41
Video thumbnail
DEVANI|संघर्ष,जिद्द आणि लोकविश्वासाचा चेहरा;रामलिंग शेरे
03:25

Latest news