24.4 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeमहाराष्ट्रपरमबीर सिंग यांच्याविरोधातील तपास बंद करण्याचा सीबीआयचा अहवाल

परमबीर सिंग यांच्याविरोधातील तपास बंद करण्याचा सीबीआयचा अहवाल

मुंबई : खंडणी मागितल्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यााचा तपास बंद करण्याचा अहवाल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुख्य न्याय दंडाधिका-यांकडे सादर केला आहे.

परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाविकास आघाडीमध्ये खळबळ माजवून दिली होती. वेगवेगळ्या महत्त्वाच्या हॉटेल आणि बारमधून वसुली गोळा करायला लावली जाते, खंडणी गोळा करायला लावली जाते, असे आरोप परमबीर सिंह यांनी केले होते.

त्यानंतर परमबीर सिंह आणि इतरांविरुद्ध खंडणी वसूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला होता. गुन्हा घडल्यानंतर पाच वर्षांनंतर तक्रार करण्यात आली असून हे आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळलेले नाहीत, असे सीबीआयने अहवालात म्हटले आहे.

२०१६-१७ मध्ये घडलेला हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक ते पुरावे उपलब्ध झालेले नाहीत वा आक्षेपार्ह काहीही आढळलेले नसल्याने सीबीआयने ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिका-यांकडे अहवाल सादर करून तपास बंद करण्याची परवानगी मागितली आहे.

परमबीर सिंग यांच्या व्यतिरिक्त उपायुक्त पराग मणेरे, संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर यांच्याविरुद्ध कोपरी पोलिस ठाण्यात धमकावणे आणि खंडणीप्रकरणी जुलै २०२१ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. आता सीबीआयने पुराव्यांअभावी तपास बंद करण्यासाठी अहवाल सादर केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR