30.6 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeमुख्य बातम्या‘सीबीएसई’च्या शाळांना राज्य सरकारचे अनुदान मिळणार

‘सीबीएसई’च्या शाळांना राज्य सरकारचे अनुदान मिळणार

नागपूर : राज्यातील अनेक सैनिकी शाळांमध्ये राज्य माध्यमिक शिक्षण बोर्डाचा अभ्यासक्रम असतो. पण
‘एनडीए’च्या परीक्षांमध्ये सीबीएससीचा अभ्यासक्रम असतो. त्यामुळे आपले विद्यार्थी एनडीएच्या परीक्षांमध्ये पास होत नाहीत. त्यामुळे लवकरच मी नवीन धोरण जाहीर करणार आहे. ज्यामुळे सीबीएससीच्या शाळांना देखील महाराष्ट्र सरकारचे अनुदान मिळणार असल्याची माहिती शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

नागपुरातील भोसला सैनिकी शाळेच्या २५ व्या वार्षिक उत्सवात शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. भोसला सैनिकी शाळेने मुलींच्या सैनिकी शाळेला परवानगी मागितली आहे. ती परवानगी एका महिन्याच्या काळात मिळेल, असे देखील दीपक केसरकरांनी म्हटले.

जगाला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ देण्याची क्षमता भारताकडे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी इतर देशातील भाषा शिकाव्या. महाराष्ट्रातील मुलांमध्ये काहीही कमी नाही. मात्र, एक कमतरता आहे, ती म्हणजे कामाचा कमीपणा मानण्याची वृत्ती. परदेशातील मुले कोणतेही काम करण्यासाठी कमीपणा मानत नाही, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR