21.5 C
Latur
Saturday, February 24, 2024
Homeक्रीडा‘उत्सव की तैयारी करो’; सरफराजसाठी सूर्यकुमार यादवची पोस्ट

‘उत्सव की तैयारी करो’; सरफराजसाठी सूर्यकुमार यादवची पोस्ट

मुंबई : देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणा-या सरफराज खानच्या नशिबाचे दार उघडले आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुस-या कसोटीसाठी सरफराज खानला टीम इंडियात संधी मिळाली आहे.

सरफराज खान याला टीम इंडियात स्थान मिळाल्यानंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गेल्या काही दिवसांपासून संघनिवडीवेळी सरफराज खानच्या नावाची चर्चा होत होती, पण त्याला स्थान मिळत नव्हते. के. एल. राहुल दुखापतीमुळे संघाबाहेर गेला अन् सरफराज खान याला टीम इंडियाचे तिकिट मिळाले. त्यानंतर आजी-माजी क्रिकेटरनी त्याला शुभेच्छा दिल्या. मुंबईकर सूर्यकुमार यादव यानेही सरफराज खान याला शुभेच्छा देताना सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. सूर्यकुमार यादवची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सूर्याने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये सरफराज खान याला शुभेच्छा दिल्या आहेत. सूर्याने दोघांचा फोटो पोस्ट करत लिहिलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. सूर्याने आपल्या पोस्टमध्ये ‘उत्सव की तैयारी करो’ असे म्हटले आहे. सूर्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR