32.6 C
Latur
Monday, February 26, 2024
Homeक्रीडाविराट कोहली माझ्यावर थुंकला होता

विराट कोहली माझ्यावर थुंकला होता

डीन एल्गरचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून नुकत्याच निवृत्त झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डीन एल्गरने विराट कोहलीसंदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. २०१७ साली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावर आला असताना विराट कोहली आणि मी रात्री ३ वाजेपर्यंत मद्य पीत बसलो होतो, असे एल्गरने एका मुलाखतीत सांगितले. त्यावेळी विराट कोहली माझ्यावर थुंकला होता. कोहलीने २०१५ साली केलेल्या चुकीच्या वर्तनाबाबत माफीही मागितल्याचे एल्गर म्हणाला.

२०१५ सालच्या दक्षिण आफ्रिका दौ-यावेळी विराट कोहली आणि डीन एल्गर यांच्यात जबरदस्त बाचाबाची झाली होती. त्यावेळी कोहली आपल्या अंगावर थुंकल्याचे एल्गरचे म्हणणे होते. याच वर्तनाबाबत कोहलीने माफी मागितल्याचे तो म्हणाला. तसेच पुन्हा असे वागला असता तर मी तुला सोडले नसते असे पार्टी वेळी कोहलीला म्हणालो असल्याचे एल्गरने सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR