पुर्णा : भारतीय जनता पार्टीने मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड विधानसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून या तीन्ही राज्यात भाजपाला प्रचंड बहुमताने निवडून दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने दि.३ रोजी शहरांतील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये मिठाईचे वाटप करून पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात विजय उत्सव साजरा केला.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष नरहरी ढोणे, शहराध्यक्ष प्रशांत कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा कोषाध्यक्ष हनुमान अग्रवाल, ऋषिकेस सकनुर, भारत एकलारे, अभियंता जिल्हाध्यक्ष विजय कराड, गोपाळराव अंभोरे, विनय कराड़, संजय मोहिते, राम चापके, कैलाश सवराते,
उद्धव मोरे, नरहरी साखरे, निवृत्ती बोकारे, रावजी हेंडगे, लहू शेळके, डॉ.अजय ठाकूर, चंद्रकांत टाकळकर, सुनील डुब्बेवार, संतोष बनसोडे, बालाजी कदम, संजय अंभोरे रोशन एकलारे, राम पुरी, श्रीकांत कदम, परमेश्वर डहाळे, मोतीराम कदम इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते