मुंबई : मुंबई पोलिसांचा ‘उमंग २०२३’ हा कार्यक्रम नुकताच जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये पार पडला. या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. दीपिका पदुकोण, रवीना टंडन, कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकरसह अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमात उपस्थित होते. आपल्या ग्लॅमरस अंदाजाने सेलिब्रिटींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर दुसरीकडे शाहरूख खानने आपल्या दमदार एन्ट्रीने तर भाईजानने जबरदस्त डान्सने या इव्हेंटमध्ये चार चाँद लावले.
‘उमंग २०२३’या कार्यक्रमात शाहरूख खानने आपल्या बॉडीगार्डसह ग्रँड एन्ट्री घेतली. काळ्या सनग्लासेसमध्ये शाहरूख खान खूपच डॅशिंग दिसत होता. तर सलमान खानदेखील ब्लॅक सूटमध्ये दिसून आला. दिग्गज पॉप सिंगर उषा उत्थुप यांच्या भाईजान पाया पडला. सलमानच्या या अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
‘उमंग २०२३’ या पोलिसांच्या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यात रणबीर कपूर, बॉबी देओल, रणवीर सिंह, हिमेश रेशमिया, सिद्धार्थ मल्होत्रा, ईशान खट्टर, सनी कौशल आणि अरबाज खानसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफने पोलिस व्हॅनवर चढून चाहत्यांसोबत चर्चा केली. या कार्यक्रमादरम्यान सेलिब्रिटींमधील जबरदस्त बॉन्डिंग दिसून आली.
‘उमंग २०२३’ या कार्यक्रमात शहनाज गिल आणि दीपिका पदुकोण एकत्र दिसल्या. या कार्यक्रमादरम्यान दोघी आनंदात, एकमेकींसोबत गप्पा मारताना दिसून आल्या. पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमात बॉलिवूड सेलिब्रिटी, उद्योगपती, आणि राजकारणी मंडळींनी हजेरी लावली. त्यांचे लूक्स चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.