17.2 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeराष्ट्रीयकाश्मीरला केंद्राने खाप पंचायत बनवले : अधीर रंजन चौधरी

काश्मीरला केंद्राने खाप पंचायत बनवले : अधीर रंजन चौधरी

नवी दिल्ली : संसदेत बुधवारी बराच गदारोळ झाला. लोकसभेत आज जम्मू आणि काश्मीर संदर्भात दोन विधयके मंजूर करण्यात आली. दरम्यान काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. सरकारवर निशाणा साधत चौधरी म्हणाले की, तुम्ही काश्मीरला खाप पंचायत बनवले आहे. एक लेफ्टनंट गव्हर्नर आणि काही अधिकारी त्यांच्या इच्छेनुसार केंद्र सरकार काश्मीरला चालवत आहेत. सहा वर्षांपासून तेथे निवडणुकाच झालेल्या नाहीत. तुम्ही आग लावली पण ती विझवायला विसरलात, असे चौधरी म्हणाले.

गृहमंत्री अमित शहा यांनी या सभागृहात काश्मीरमध्ये योग्य वेळी विधानसभा निवडणुका होतील असे सांगितले होते. यावर चौधरी म्हणाले की, सरकारने तिथे स्थानिक निवडणुका घेतल्या पण विधानसभा निवडणुका घेतल्या नाहीत. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते, ते पूर्ण करायला विसरले आहे. चौधरी म्हणाले की, भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार, नेहरू देशासाठी हानिकारक आहेत आणि तुम्ही (सरकार) देशासाठी फायदेशीर आहात. त्यामुळे या विषयावर दिवसभर चर्चा व्हायला हवी, असे आव्हान त्यांनी सरकारला दिले.

‘ही’ घटना टाळता आली असती
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात चौधरी यांनी जम्मू आणि काश्मीरच्या माजी लेफ्टनंट गव्हर्नरच्या दाव्याचा संदर्भ दिला की, ही घटना टाळता आली असती. चौधरी म्हणाले की, ते सरकार-नियुक्त लेफ्टनंट गव्हर्नर होते, तुम्ही त्यांना नाकारू शकत नाही. खोऱ्यात काश्मिरी पंडितांचे पलायन आणि लक्ष्यित हत्या अजूनही होत आहेत, परंतु सरकार हे मान्य करण्यास तयार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR