मुंबई : मालाड पूर्व येथील सेंटर प्लाझा नावाच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. मालाड पूर्वेच्या दफ्तरी रोडवर असलेल्या सेंटर प्लाझा नावाच्या इमारतीत पाचव्या मजल्यावर आग भडकली. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आगीचे स्वरुप भीषण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून आग इतर मजल्यांवरही पसरण्याची शक्यता आहे. इमारतीच्या खिडक्यांच्या काचा आगीने फुटून खाली रस्त्यावर पडत आहेत. त्यामुळे परिसरातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.