21.3 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रमध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस एलएचबी कोचसह चालविणार

मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस एलएचबी कोचसह चालविणार

मुंबई : मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसच्या पारंपरिक आईसीएफ रेकचे एलएचबी रेकमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
१२१४० नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्स्प्रेसचा पहिला रेक एलएचबी डब्यांसह दि. २५ मे २०२४ पासून चालविण्यात येईल. १२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस दि. २६ मे २०२४ पासून चालविण्यात येईल. १२१४० नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्स्प्रेसचा दुसरा रेक एलएचबी डब्यांसह दि. २६ मे २०२४ पासून चालविण्यात येईल.

१२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस दि. २७ मे २०२४ पासून चालविण्यात येईल.
एकूण २२ कोच – दोन वातानुकूलित-द्वितीय, १२ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ४ शयनयान, गार्डस् ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅनसह तीन जनरल सेकंड क्लास.

एलएचबी रेक्स – लिंक हॉफमॅन बुश (एलएचबी) कोच हा जर्मनीच्या लिंक – हॉफमॅन बुशने विकसित केलेला प्रवासी कोच आहे. हे भारतीय रेल्वेने अ‍ॅडॉप्ट केले आहे आणि कपूरथळा, चेन्नई आणि रायबरेली येथील रेल्वे कोच उत्पादन युनिट्सद्वारे उत्पादित केले आहे. पारंपरिक आईसीएफ रेकपेक्षा त्याचे अनेक फायदे आहेत.

– आईसीएफ डब्यांपेक्षा हलके आणि लांब
– उत्तम गती
– सुरक्षित. ते रुळावरून घसरल्यास शेजारच्या डब्यावर चढत नाहीत
– वर्धित आसन क्षमता
– बायो टॉयलेट्स बसविण्यात आलेले
– उच्च वेगाने कार्यक्षम ब्रेकिंग
– उत्तम वातानुकूलित
– किफायतशीर आणि कमी देखभाल खर्च
आईसीएफ डबे एलएचबी डब्यांसह बदलणे हे प्रवाशांना उत्तम प्रवासाचा अनुभव देण्याच्या दिशेने रेल्वेचे आणखी एक पाऊल आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR