28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रछ. संभाजीनगरहून थेट गाठता येणार सिंगापूर , बँकॉक

छ. संभाजीनगरहून थेट गाठता येणार सिंगापूर , बँकॉक

छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर मधल्या रहिवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. लवकरच छत्रपती संभाजी नगर येथून सिंगापूर, बँकॉक असा थेट प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. एक मलेशियन कंपनीकडून ही विमानससेवा सुरु होणार असल्याची माहिती आहे.

एवढेच नाही तर विमानतळ प्राधिकरणाची यासाठी कंपनी सोबत प्राथमिक चर्चा झाल्याची ही माहिती आहे. मलेशियन कंपनी एअर आशिया ही सेवा सुरु करणार असल्याची माहिती विश्व्सनीय सूत्रांकडून एका माध्यमाला देण्यात आली आहे. मलेशियन कंपनी असणा-या एअर आशिया या विमान कंपनीने या वर्ष अखेरपर्यंत देशातील सहा शहरांमधून उड्डाण करण्याचे नियोजन केले असून त्यामध्ये संभाजीनगर शहराचा देखील समावेश असल्याची माहिती आहे.

सध्याचा विचार करता छत्रपती संभाजी नगर विमानतळावरून स्पाइस जेट, टू जेट एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांकडून विविध मार्गांवर विमान सेवा सुरू करण्यात आल्या होत्या प्रामुख्याने मुंबई हैदराबाद दिल्ली बेंगळुरू अहमदाबाद या शहरांसाठी विमान सेवा आहेत. तर अहमदाबाद ची सेवा मध्यंतरी काही कारणास्तव बंद झाली होती मात्र ३ मार्चपासून ही सेवा देखील नव्याने सुरू करण्यात येत आहे. त्यानंतर आता कंपनीकडून नवीन सेवा जोडण्यात येणार आहे.
ही नवीन विमान सेवा सुरू झाल्यास संभाजीनगर शहरातून थेट सिंगापूर आणि बँकॉक साठी विमान उपलब्ध होईल आणि त्यामुळे पर्यटन आणि उद्योग यांच्या वाढीला चालना मिळणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR