नवी दिल्ली : वृत्तसंस्था
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात संबंध खराब झाल्याची मागच्या काही महिन्यांपासून चर्चा आहे. आता ताज्या रिपोर्ट्नुसार युजवेंद्र चहलला घटस्फोटासाठी ६० कोटी रुपयांची मोठी रक्कम चुकवावी लागणार आहे. घटस्फोटाच्या रक्कमेचा आकडाच एवढा मोठा आहे की, सर्वसामान्यांचे डोळे विस्फारतील.
मागच्या काही दिवसांपासून युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या व्यक्तीगत आयुष्यात सर्वकाही आलबेल नसल्याच्या बातम्या येत आहेत. युजवेंद्र चहल टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज तर धनश्री वर्मा डान्सर आहे. मागच्या काही दिवसांपासून युजवेंद्र आणि धनश्री विभक्त होणार असून त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
दोघांच्या सोशल मीडिया आणि इन्स्टाग्राम पोस्टवरुन दोघे वेगळे होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. युजवेंद्र चहल आणि धनश्रीच लग्न डिसेंबर २०२० मध्ये झालं. दोघांनी पहिल्या भेटीनंतर लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याचा खुलासा त्यांनी एका शो मध्ये केला.
चहल आणि धनश्रीच लग्न पाच वर्ष सुद्धा टिकलं नाही. विषय घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचला.
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा दोघे वेगवेगळ्या प्रोफेशनमधले आहेत. चहल क्रिकेटर आहे, तर धनश्री डेन्टिस्टच शिक्षण घेणारी पेशाने डान्सर आणि कोरियोग्राफर आहे.
लग्नानंतर पहिली तीन वर्ष दोघांचे चांगले संबंध होते. प्रत्येक व्यासपीठावर दोघे एकत्र दिसले. दोघांनी एकत्र येऊन एक शो सुद्धा केला. एका डान्स शो मध्ये धनश्रीला सपोर्ट करण्यासाठी चहल तिथे गेलेला.
विवाहच्या चौथ्या वर्षी दोघांचे संबंध बिघडल्याच्या बातम्या येऊ लागल्या. दोघे अनेक ठिकाणी एकत्र दिसायचे बंद झाले.
त्यानंतर लोकांनी त्यांच्या नात्याबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली. या दरम्यान युजवेंद्र चहलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन धनश्रीचे फोटो डिलीट केले. त्यावरुन दोघांचे संबंध बिघडल्यावर शिक्कमोर्तब झाले. आता अशी बातमी आहे की, घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल धनश्री वर्माला ६० कोटी रुपये देणार आहे.