18.2 C
Latur
Wednesday, November 13, 2024
Homeराष्ट्रीयचंपई सोरेन भाजपात?

चंपई सोरेन भाजपात?

नवी दिल्ली : झारखंडमधील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या नाराजीच्या चर्चांमुळे सध्या झारखंडच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे. यादरम्यान, चंपई सोरेन हे दिल्लीमध्ये आले आहेत. दिल्लीत आल्यावर त्यांना प्रसारमाध्यमांनी गाठले तेव्हा प्रतिक्रिया देताना चंपई सोरेन म्हणाले की, मी येथे माझ्या खासगी कामासाठी आलो आहे. तसेच भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत विचारले असता त्यांनी मी सध्या जिथे आहे तिथेच आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना चंपई सोरेन यांनी सांगितले की, तुम्ही लोक ज्या प्रकारे मला प्रश्न विचारत आहात त्यावर मी काय बोलणार. मी सांगितले आहे की मी इथे खासगी कामासाठी आलो आहे. तसेच मी जिथे आहे तिथेच राहणार आहे. त्यानंतर कोलकाला येथे सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत विचारले असता. चंपई सोरेन म्हणाले की, माझी कोलकात्यामध्ये कुणाशीही भेट झाली नाही. मी खासगी कामामुळे येथे आलो आहे. त्याबाबत नंतर तुम्हाला सांगेन.

खासगी स्टाफही दिल्लीत
विमानतळावरून रवाना झाल्यानंतर चंपई सोरेन हे थेट झारखंड भवनच्या दिशेने गेले. तिथे त्यांच्या नावाने तीन खोल्यांचे बुकिंग झालेले आहे. चंपई सोरेन यांच्यासोबत त्यांच्या खासगी स्टाफमधील काही लोकही दिल्लीमध्ये आले आहेत.

सोरेन कुठेही जाणार नाहीत : पांडे
दुसरीकडे चंपई सोरेन यांच्या भाजपामधील प्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रवक्ते मनोज पांडे यांनी सांगितले की, चंपई सोरेन यांच्याबाबत अफवा पसरवली जात आहे. ते कुठेही जाणार नाहीत. चंपई सोरेन हे एक क्रांतिकारी व्यक्तिमत्त्व आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR