26.3 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeराष्ट्रीयसंसदेत पहिल्याच दिवशी गदारोळ

संसदेत पहिल्याच दिवशी गदारोळ

अदानींच्या लाचखोरीच्या आरोपावरून विरोधक आक्रमक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले.अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अदानी लाचखोरी प्रकरणावरून संसदेत गदारोळ उडाला. त्यानंतर कामकाज काहीकाळ तहकूब करण्यात आले. यासोबतच लोकसभेत सध्या प्रलंबित असलेले बँकिंग दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.

यापूर्वी ऑगस्ट २०२४ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने बँकिंग विधेयक मंजूर केले होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बँकिंग दुरुस्ती विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक २०१४ अंतर्गत, बँक खात्यांसाठी नॉमिनी व्यक्तींची संख्या चार करण्याचा प्रस्ताव आहे. जेव्हा बँकिंग दुरुस्ती विधेयक लोकसभेच्या पटलावर मंजूर होईल, तेव्हा प्रत्येकाला आपल्या बँक खात्यात ४ नॉमिनेशन करणे अनिवार्य असेल. या विधेयकांतर्गत प्रत्येक बँक खात्यावर नॉमिनी व्यक्तींची मर्यादा वाढवून चार करण्याचा प्रस्ताव आहे, जी सध्या एक आहे.

संसद विस्कळीत
करण्याचा प्रयत्न
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा व्यक्त केली की, या अधिवेशनात फलदायी आणि रचनात्मक चर्चा होईल. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करत ते संसद विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. वेळ आल्यावर त्यांना जनता जबाबदार धरेल. २०२४ चा हा शेवटचा काळ आहे, देशही २०२५ चे स्वागत जोशात आणि उत्साहात करण्याच्या तयारीत आहे, असे ते म्हणाले.

१६ विधेयके सूचीबद्ध
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. या अधिवेशनात सरकारने वक्फ (दुरुस्ती) विधेयकासह १६ विधेयके सूचीबद्ध केली आहेत. सध्या लोकसभेत आठ आणि राज्यसभेत दोन विधेयके प्रलंबित आहेत. संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या हिवाळी अधिवेशनात मोदी सरकार अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR