13.2 C
Latur
Wednesday, November 19, 2025
Homeमहाराष्ट्रनवाब मलिक यांच्यावर अखेर आरोप निश्चित

नवाब मलिक यांच्यावर अखेर आरोप निश्चित

डिसेंबरच्या दुस-या आठवड्यापासून सुनावणी

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात विशेष एमपी-एमएलए न्यायालयाने मोठा धक्का दिला. या प्रकरणात मलिक यांच्यासह इतर आरोपींवर आरोप निश्चित केले असून, या प्रकरणी डिसेंबरच्या दुस-या आठवड्यापासून दैनंदिन सुनावणीला सुरुवात होणार आहे.

ईडीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर, तिचा साथीदार सलीम पटेल, १९९३ च्या मुंबई स्फोटातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कम्पाउंडमधील मुनीरा प्लंबर यांच्या मालकीची तीन एकर जमीन कट रचून बळकावली, असा आरोप आहे. या व्यवहारातून मिळालेला निधी प्रोसिडस् ऑफ क्राईम म्हणून वापरला गेल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

मलिक यांना या प्रकरणात २०२२ मध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना उच्च न्यायालयातून जामीन मिळाला असून ते सध्या जामिनावर आहेत. या प्रकरणातील सुनावणीसाठी आज दुपारी ३ वाजता विशेष न्यायालयात हजेरी लावली. न्यायालयाने पुरावे आणि दस्तऐवजांचा अभ्यास करून, मलिक आणि इतर आरोपींविरुद्धच्या आरोपांना प्राथमिकदृष्ट्या आधार आहे, असे नमूद केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR