शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
शहरातील श्री अनंतपाळ नवयुवक वाचनालयाचे सहाय्यक ग्रंथपाल श्रीमती शिवनंदा चौसस्टे यांना कामानिमित्त जात असताना रस्त्यावर सापडलेले तब्बल दहा रुपयांचे पाकीट त्यांनी सचिन गणपत नंदगावे बेवनाळ यांना परत केले. या घटनेमुळे जगात प्रामाणिकपणा असल्याचा प्रत्यय आला आहे. त्यांच्या या प्रामाणिकपणाचा कौतुक होत आहे.
ग्रंथपाल श्रीमती शिवनंदा चौसस्टे वाचनालयाच्या कामानिमित्त रस्त्याने जात असताना रोडवर त्यांना पाकीट सापडले ते घेऊन वाचनालयात आल्या व ग्रंथपाल काशिनाथ बोडके यांच्यासमोर पाकीट उघडले असता पाकिटात दहा हजार रुपयांसह महत्वाचे कागद पत्र आढळून आले. या पाकीटातील कागदपत्रावर सचिन गणपत नंदगावे बेवनाळ असे नाव होते. व त्यात मोबाईल नंबर आढळून आला. त्यांना फोन करून वाचनालयात बोलावून घेऊन त्यांना पाकीट परत करण्यात आले.श्रीमती शिवनंदा चौसस्टे यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा श्री अनंतपाळ नवयुवक वाचनालयच्या वतीने शिक्षण महर्षी प्रभाकरराव कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वाचनालयचे अध्यक्ष एल. बी. आवाळे, सचिव डॉ. राजकुमार बोपलकर, कोषाध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी, सौ.लता शेरसांडे, सौ.सुनीता देवसटवार, श्रीमती ललिता शिवणे, ग्रंथपाल काशिनाथ बोडके, अनंत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.